TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दरोडा प्रकरणातील टोळी अटकेत ; ‘एलसीबी’ने आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या !

जाणून घ्या...टोळीतील म्होरक्याने कशासाठी रचला होता दरोड्याचा कट !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील प्रसिद्ध वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात जळगाव एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. सायंकाळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील म्होरक्या अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर दरोड्याचा कट रचला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा कट रचला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

काय घडलं होतं नेमकं ‘त्या’ रात्री !
जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे परिवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. दि.१४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ७ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरात बळजबरी घुसले होते. पत्नीचा आवाज ऐकून घरात फ्रेश होत असलेले किरण बच्छाव देखील पुढे आले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

आयफोन हिसकवात मागील बाजूने काढला होता पळ

दरोडेखोरांनी किरण बच्छाव यांच्यावर चाकूने वार केले परंतु ते थोडक्यात चुकले. किरण बच्छाव यांच्या पत्नीने खिडकीतून जोरात आवाज दिला असता शेजारील महिलेने सर्व दृश्य पाहिले व आरडाओरडा केली. बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी एक आयफोन हिसकवला आणि मागील बाजूने पळ काढला. घराच्या मागील बाजूस ३०० मीटर अंतरावर आयफोन, जॅकेट, मफलर आणि मिरची पूड पॅकेट मिळून आले आहे. दरोडेखोरांनी तिजोरी आणि डी. डी. बच्छाव व त्यांच्या पत्नी कुठे असल्याची देखील विचारणा केली होती.

यांना केलीय अटक
किरण बच्छाव यांच्या फिर्यादवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाईला सुरूवात केली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी तीन पथक नेमून विदगाव, आव्हाणे आणि जैनाबाद येथे रवाना केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी यश सुभाष कोळी (वय-२१), अर्जून नगर ईश्वर कोळी (वय-३०), दर्शन भगवान सोनवणे (वय-२९), करण गणेश सोनवणे (वय-१८), अनिल भानुदास कोळी (वय-३१), सचिन रतन सोनवणे (वय-२७) आणि सागर दिलीप कोळी (वय-२८) सर्व रा. दाजीबा चौक, विदगाव ता.जि.जळगाव यांना अटक करण्यात आली.

एलसीबीच्या पथकात यांचा होता समावेश 

एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी नेमलेल्या तांत्रिक विश्लेषण पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदिप सावळे, पोना किरण चौधरी, पोकॉ लोकेश माळी, पथक क्रमांक १ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, पथक क्रमांक २ मध्ये सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, हवालदार राजेश मेढे, पोह संजय हिवरकर, पोह लक्ष्मण पाटील, पोकॉ प्रमोद ठाकुर, पथक क्रमांक ३ मध्ये पोना प्रविण मांडोळे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, रविंद्र पाटील, पथक क्रमांक ४ मध्ये पोलीस हवालदार अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, दर्शन ढाकणे यांचा समावेश होता.

 

सर्व संशयित आरोपींना २३ पर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, सर्व संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता दि.२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरोडा घालणारे संशयीत हे सर्वच सराईत गुन्हेगार नसून ७ जणांपैकी तिघांवर काही गुन्हे दाखल आहेत. इतर सर्व नवखे आहेत. गुन्ह्याच्या अगोदर रेकी करण्यासाठी देखील ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पायी किंवा रिक्षाने त्याठिकाणी आले होते. गुन्ह्याचा आणखी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

महाराष्ट्रातून 'हे' पार्सल परत पाठवायची वेळ आली ; राज्यपालांविरोधात मनसेसह राष्ट्रवादी आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !

November 25, 2021

प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या रणरागिणीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सलाम !

December 30, 2020

दहा लाख जमा करा ; हायकोर्टाचे गिरीश महाजन यांना निर्देश

March 4, 2022

वाघुर धरणाचे आठ दरवाजे उघडले ; सतर्कतेचा इशारा

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group