राळेगणसिद्धी (वृत्तसंस्था) भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने केलेल्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व कायद्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले.
या संदर्भात अधिक असे की, विविध विषयांवर आंदोलने करणाऱ्या हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही सहभागी व्हावे, अशी मागणी होत होती. त्यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळही राळेगणसिद्धीला येऊन गेले होते. सुरुवातीला हजारे यांनी या आंदोलनास पाठिंबा देत एका दिवसाचे उपोषणही केले होते. त्याच दरम्यान आपल्या जुन्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणाही हजारे यांनी केली. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी मैदान आणि परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी अर्जही केला आहे. मधल्या काळात भाजपच्या एका शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन त्यांना नव्या कृषी कायद्याच्या मराठी प्रती दिल्या. दिल्लीत आंदोलन न करण्याची विनंतीही केली. मात्र, हजारे यांनी त्यांची ही विनंती धुडकावून लावली होती. मात्र, आता भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने केलेल्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व कायद्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले. तसेच ह्या कायद्यातील तरतुदी शेतकरी बांधवांसाठी कश्या लाभदायक आहेत ह्याबदद्ल माहिती दिली.