जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात सुनील झंवर यांचा आरोपींमध्ये समावेश झाल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन हे मागील दोन दिवसापासून बारामतीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे उत्तर दिले. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याशी संबंधित मुद्द्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल ११०० कोटी रूपयांची असून यात बड्या मंडळीने मातीमोल भावात बँकेच्या मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप केला. परंतू कुणाचेही थेट नाव घेण्याचे टाळले. दुसरीकडे बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यात गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांचा आरोपींमध्ये समावेश झाल्यानंतर चर्चेला उधान आले आहे. तर मागील दोन दिवसापासून गिरीश महाजन हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आज सकाळपासून जिल्ह्यात जोरात सुरु आहे. याबाबत थेट गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
गिरीश भाऊ, आप्पा केलास सोनवणे , नाथाभाऊ यांनी जळगाव जिल्ह्यात बीजेपी चे बीज रात्र दिवस जीवाची परवा न करिता मेहनत केली, तांच्या नशिबात काय आले, नाथाभाऊ भाऊ, महाराष्ट्र चे मुख्यमंत्री चे दावेदार होते काय केले, st, nt, obc, aadr विचार करा??????????
बीएचआर मधील सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा काराग्रहातील बीएचआर चा संस्थापक रायसोनी,अनेक भ्रष्ट नेत्यांपासून,कामचूकार व भ्रष्ट,लाच खाणारी शासकीय यंत्रणा सर्वच जबाबदार आहेत. सामान्यांंना कोणी वाली नाही.राजकारणी व संघटित सरकारी कर्मचारी आपल्या सुखसूविधा मिळवतात पण खाजगी व असंघटित आपले उर्वरित आयुष्य कसे जगत असेल ?हि विषमता वाढतच का जात आहे ? मोबा.७२७६०५०१५१.पुणे.