धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील बहुजन मुलीवर गावातील तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला विष दिले. धुळे येथील हिरे मेडिकलमध्ये उपचार घेत असतांना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शिक्षा होऊन पारोळा येथील पीडितेला त्वरीत न्याय देण्यात यावा, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदन आज तहसीलदार तथा पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या घटनेचा आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो. ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मनाला चटका देणारी आहे. बहुजन समाजासाठी हे अतिशय घातक आहे. लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. वरील घटनेसंदर्भात सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत लक्ष्मणराव पाटील , पी. डी. पाटील, व्ही. टी. माळी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी , अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसिलदार नितीनकुमार देवरे साहेब , सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजाळ साहेबांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष हेमंत माळी, महासचिव आकाश बिवाल, माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, सिराज कुरेशी, लोकपत्रिका न्यूज वार्ताहार सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विलास कढरे, रविंद्र गजरे, ललित भदाणे, तेजेंद्र चंदेल, संत सावता माळी युवक संघाचे समाधान माळी, अॅड. संदीप पाटील, अॅड. शरद माळी, सिताराम मराठे, विक्रम पाटील, श्रीनाथ साळुंखे, मयूर भामरे, राहुल मराठे, बबलू वाघमारे, प्रकाश सपकाळे, दिपक सोनवणे, अमोल सोनार, मयूर माळी, सागर गायकवाड, पंकज पवार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.