चोपडा प्रतिनिधी – मागील बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीत धनगर समाज समाविष्ट असतांना सुध्दा धनगर समाज वंचीत आहे, वेळोवेळी केंद्र सरकार व राज्य सरकार फक्त अंमलबजावणीचे आश्वासन देते व पुन्हा विसरते तसेच समाजाला सध्याचा राज्य सरकार कडून दहा महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयावर एकही बैठक न घेता समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असून तात्काळ यावर निर्णय घेण्यात यावा, अशा मागणीचे चोपडा तालुक्यातील समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यामुळे धनगर समाजाच्या प्रत्येक माणसात सरकार विषयी प्रचंड प्रमाणात असंतोष व नाराजी आहे. त्यामुळे आता धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारीत आहे. तरी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आज चोपडा तहसीलदार अनिल गावित व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात. समाजाच्या वत्तीने “ढोल बजाओ, सरकार जगाओ अंदोलन करण्यात येणार होते. परंतु चोपडा तालुक्यात कोरोना व्हायरसने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ” ढोल बजाओ अंदोलन स्थगित करुन निवेदन देवुन भावना व्यक्त केली.
यावेळी माजी पं,स सभापती आत्माराम म्हाळके ,नगरसेवक महेंद्र धनगर, भगवान न्हायदे, वासुदेव धनगर, शैलेश धनगर, नंदलाल धनगर, विजय भालेराव, शालीक धनगर, विक्की धनगर, ऋषिकेश धनगर,नरेंद्र भालेराव, योगेश कंखरे, दीपक बिर्हाडे, मेहुल धनगर लीलाधर धनगरसह समाज बांधवांची उपस्थिती होती.