नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शुक्रवारी मौल्यवान सोन्या आणि चांदीच्या किमतींनी उसळी घेत व्यवहार होत आहे. या पंधरवाड्यात सोन्याची मागणी गगनाला भिडली आहे. अनेक बँकांनी पण सोन्यात गुंतवणूक वाढवल्याने सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी एकाएक उसळी घेतली आहे. तर चांदीही चमकली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी जून २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव ५ रुपये किंवा ०.०१% वाढून ५९,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे आज डॉलरच्या दरात घसरण झाली, ज्यामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते.
गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. एक किलो चांदी 73000 रुपयांच्या जास्तीचा राहिला आहे. यामुळेच चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचा कालचा भाव 73000 रुपये होता. आज हा भाव 73300 रुपये प्रति किलो होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती.
नाशिकमध्येही सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 59 हजार 700 रुपये होता. आज तोच दर 60 हजार 30 रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 330 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 54 हजार 730 रुपये होता,आज तोच दर 55 हजार 30 रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्या मागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर जळगावातही 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 59 हजार 700 रुपये असाच आहे. 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 54 हजार 730 रुपये असा आहे.