नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थान प्राथमिक शिक्षण विभागानं (Department of Elementary Education) ३२००० प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. REET पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील.
टीएसपी आणि नॉन-टीएसपी क्षेत्रांतर्गत एकूण ३२००० जागा रिक्त आहेत. त्यापैकी प्राथमिक स्तरासाठी १५,५०० आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी १६,५०० जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी इत्यादीसारख्या अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आलीय. इच्छुक उमेदवार ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार education.rajasthan.gov.in या वेबसाइटवरती भेट देऊ शकतात.