अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. भुसावळकडून नंदुरबारकडे जात असताना ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली मात्र, मालगाडीचे डबे घसरून पडल्याने भुसावळ सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली असून या अपघातात सुदैवाने लोको पायलटसह गार्ड हे सुरक्षित असून जीवित हानी टळली आहे. भुसावळ कडून कोळसा घेऊन नंदुरबार कडे जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून या अपघातात मालगाडीचे डबे रुळावरून घसरून पडल्यामुळे सुरत भुसावळ दरम्यान अपडाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त मालगाडी हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
















