साकळी ता.यावल (प्रतिनिधी) भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व रावेर पंचायत समिती सभापती डॉ. मिलिंद वायकोळे यांनी शिरसाड येथील कै. सौ. कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय येथे भेट दिली.
यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पाटील यांनी त्यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार केला व आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच युवा नेतृत्व गीत वायकोळे यांचा देखील सत्कार यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील यांनी केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जिल्हा सदस्य कुणाल कोल्हे, दीपक खंबायत, पांडुरंग पाटील, धनराज पाटील इत्यादी उपस्थित होते. यावेळी डॉ. मिलिंद वायकोळे यांनी वाचनालय बाबत कौतुक केले.













