मुबंई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजापाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी युती केली. ज्यावेळी भाजपा केंद्रात सत्तेत आली होती. त्यावेळी त्यांच्या सोबतील अनेक मित्रपक्ष होते. पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात शिवसेना तसेच अटजींच्या नेतृत्वात तृणमूलही भाजपासोबत होते. मात्र, हळूहळू सर्व पक्ष भाजपापासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, ते सुद्धा आज बाहेर पडले आहेत. भाजपा आमच्या कामकाजात सातत्याने दखल देत होती, असा आरोप नितीशी कुमार यांनी केला आहे. तशाच प्रकारचे आरोप अन्य पक्षांनीही सोडून जाताना केले होते. नितीश कुमारांनी देशभरात एक मोठं उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी आजची परिस्थिती आहे”, अशी टीका खडसे यांनी केली.