जळगाव (प्रतिनिधी) इकारा शिक्षण संस्थेचे एच जे थीम कला व विज्ञान महािद्यालय मेहरूण जळगाव येथे आय. टी. व गणित या विषयाच्या पदवीत्तर विषयाला महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच प्राणीशास्त्र या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र शासाकडून मान्यता मिळाल्याबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. इकबाल शाह, संस्थेचे इतर पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रशासनाचे तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आभार व्यक्त केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद शुजाअत अली, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊन पुरे पूर फायदा घ्यावे.