जळगाव (प्रतिनिधी) गावाच्या एकीच्या जोरावर गावातील कोणते काम अशक्य नाही. आता निवडणूक संपली असल्याने गावातील मतभेद विसरून गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून , बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असून रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्त्याचे डांबरीकरण करून त्यासाठी ४ कोटीचा निधी लवकरच मंजूर करणार असून शेती रस्त्याना प्राधान्य देवून गाव अंतर्गत गटार बधाकामासाठी व रस्ते काँक्रिटीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते रामदेववाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण व विविध विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते.
या कामांचे झाले लोकार्पण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावाच्या बस स्थानकाजवळ शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल – ताश्यांच्या गजरात शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत २ कोटी ५० लाखाच्या प्रगतीत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. २० लक्ष खर्च करून बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे , १५ लक्ष निधीतून नवीन गावठाण मध्ये इलेक्ट्रिक पोल व ट्रान्सफार्मरचे , २५१५ मधून गावांतर्गत डांबरीकरण करणे १३ लक्ष, आमदार निधीतून ५ लाखाचे गटार बांधकाम , १० लक्ष च्या जि. प. मराठी शाळेला संरक्षक भिंतीचे लोकार्पण तसेच शालाखोली दुरुस्ती ९ लक्ष , गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे ३ लक्ष, १५ व्या आयोगातून १२ लक्ष गटार बाधकाम , अंगणवाडी दुरुस्ती, रस्ता काँक्रिटीकरण व पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली असून संत सेवालाल महाराज सभागृहाचे १५ लक्ष व रस्ता काँक्रिटीकरण ०५ लक्ष कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्याक्रमचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर प्रास्ताविकात ग्रा.पं. सदस्य राजेश राठोड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात पाण्याची योजना, रस्ते कॉन्क्रीटीकरणासह केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली . आभार लोकनियुक्त सरपंच सौ. जिजाबाई संतोष राठोड यांनी मानले. गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठ – मोठे बॅनर व भगव्या पताका लावून परिसरातील वातावरण भगवामय झाले होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, मुकुंद नन्नवरे, महिला आघाडीच्या सरिताताई कोल्हे – माळी, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, दिपक राठोड , राजेश राठोड , अर्जुन पाटील, धोंडू जगताप , लोकनियुक्त सरपंच जिजाबाई राठोड, रवींद्र कापडणे, म्हसावद सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच उखा राठोड, , ग्रामसेवक सी.व्ही. चौधरी, शाखा प्रमुख अरुण जाधव, शिलाबाई चव्हाण, शांताबाई चव्हाण, राजेश राठोड, प्यारीबाई राठोड, माजी चेअरमन मिश्रीलाल राठोड, माजी सरपंच संतोष राठोड, प्रकाश पवार, युवराज पवार , रमेश जाधव, पंडित राठोड, अरुण जाधव, अमरसिंग चव्हाण, गोपीचंद चव्हाण, निलेश राठोड विकास राठोड, प्रेम राठोड बाळू चव्हाण, युवासेनेचे रामकृष्णा काटोले, पी. के. पाटील, व परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांड्यांमध्ये होत आहे “संत सेवालाल महाराज समाज मंदिर”
वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने अंतर्गत तांडा वस्तीच्या विकासाठी जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे – १५ लक्ष, रामदेववाडी येथे सभामडप बांधकाम करणे – १५ लक्ष, धानवड तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे – १५ लक्ष, वसंतवाडी तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – ५ लक्ष, मोहाडी येथील बंजारा वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष, विटनेर तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – ५ लक्ष, तसेच कुऱ्हाळदे तांडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष तर धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे संत सेवालाल महाराज समाज मंदिर बांधणे – १५ लक्ष अश्या विविध विकास कामांसह संत सेवालाल महाराज यांचे असे १ कोटीच्या विविध विकास कामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजुरी मिळालेली कामे प्रगतीत आहेत.