TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मास्क वाटप !

संत सावतामाळी युवक संघाचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शहर व तालुका कार्यकारणीच्या वतीने नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करत वेले येथील अमर संस्था संचालित मनोरुग्ण सेवाश्रम मानव सेवा या ठिकाणी तेथील प्रभुजी म्हणजेच मनोरुग्णांना मास्कचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हे बारावी परीक्षेनंतर नीट परीक्षेच्या तयारीसाठी कोटा,नांदेड अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे क्लासेस लावतात. मात्र परिस्थितीची जाणीव ठेवत चोपडा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी स्थानिक शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन इथेच राहून नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शहर व तालुका कार्यकारणी च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हस्ते सध्याच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीने जगभर उच्छाद मांडलेल्या स्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत वेले येथील अमर संस्था संचालित मनोरुग्ण सेवाश्रम मानव सेवा या ठिकाणी तेथील प्रभुजी म्हणजेच मनोरुग्णांना मास्कचे वाटप करण्यात आले.
युवक संघाच्या वतीने या यशाचे शिखर संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कार्यक्रमाच्या प्रसंगी मेडल व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लासुर येथील माळी समाजाचे नेते व माजी उपसरपंच ए.के. गंभीर तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे हे उपस्थित होते. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून धरणगाव येथील प्रसिद्ध एमएस डॉ. देवकीनंदन वाघ यांची उपस्थिती लाभली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या हस्ते मास्क वाटप केले गेले. नंतर युवक संघाच्या वतीने मेडल व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
प्रिवेंशन म्हणजेच एखाद आजार होण्यापूर्वी घेतलेली काळजी. ती पोलिस खाते कशा पद्धतीने समाजात एखादा गुन्हा घडू नये यापूर्वी घेत असते, या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्र व पोलिस क्षेत्राची सांगड घालत शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रसिद्ध एम.एस. डॉ. देवकीनंदन वाघ यांनी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणांमध्ये ए.के.गंभीर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या परिस्थितीविषयी जाणीव करून दिली. या छोटेखानी कार्यक्रमाला संत सावतामाळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, युवक संघाचे विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, विभागीय संपर्कप्रमुख समाधान माळी, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश माळी, शहर उपाध्यक्ष विठ्ठल माळी यांनी उपस्थिती देऊन सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वाघजाळे , वाघजाळे मॅडम, वाय.डी.पाटील, सागर धनगर व भरत महाजन यांची देखील उपस्थिती होती. सदर कार्यक्रम वेळी अमर संस्थेच्या वतीने आजच्या कोविड-१९ परिस्थितीत मनोरुग्णाची प्रामाणिकपणे मनापासून सेवा केली जात आहे. त्यामुळे अमर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब चंद्रकांत गुलाबराव पाटील व मानव सेवेचे व्यवस्थापक एन.आर. पाटील यांना कोरणा योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी केले.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
Next Post

कोरोनिल किट विकून पतंजलीने चार महिन्यात कमावले तब्बल २४१ कोटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाईंदरचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना महिला शिवसैनिकांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

April 18, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 31 मे 2024 !

May 31, 2024

धोंडखेडा ग्रामपंचायतीत शिंदे गट व भाजपाचेच बहुमत ; बोदवड येथे सत्कारावेळी ग्रा.पं सदस्यांचे स्पष्टीकरण !

December 21, 2022

मध्यरात्रीतून धनंजय मुंडेनी घेतली फडणवीसांची भेट ; चर्चेला जोरदार उधाण !

July 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group