जळगाव (प्रतिनिधी) तेली समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाज बहुद्देशीय मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले.
संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी शोभा यात्रा काढण्यात येते. पण यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे साधेपणाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थित संताजी माहाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भंडारा येथील घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अनिल चौधरी, प्रशांत सुरळकर, अशोक चौधरी, अनिल चौधरी, संदीप चौधरी, प्रदीप चौधरी, बी एम चौधरी, प्रकाश चौधरी, सुभाष चौधरी, देविदास चौधरी, ऍड महेंद्र चौधरी, डॉ. पोपट चौधरी, सुरेश चौधरी, रमेश चौधरी, वि आर पाटील, जे बी चौधरी, देविदास चौधरी, आबा चौधरी, योगेश चौधरी, भारत चौधरी, अमोल चौधरी, उमेश चौधरी, ओम चौधरी, एल सी चौधरी, योगीराज चौधरी, प्रदीप चौधरी, योगेश चौधरी, ऍड चंद्रकांत चौधरी, रमेश चौधरी, आदी उपस्थित होते.