जळगाव (प्रतिनिधी) शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, लेखाधिकारी दिलीप वानखेडे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.