धरणगाव (प्रतिनिधी) सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर प्रारंभी प्रचंड चुरशीची वाटणारी बाजार समितीची निवडणूक दुपारपर्यंत मात्र, एकतर्फी झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या महायुतीच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला राखला गड कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतमोजणी सुरु झाल्यानंतर हमाल-मापाडी आणि ग्रामपंचायत मतदार संघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारांनी विजयाचे खाते उघडले. परंतू सोसायटी मतदार संघात प्रारंभी महाविकास आघाडी धक्का देणार की काय?, असे वाटत होते. परंतू थोड्याच वेळात मात्र, निकालाचा कल बदलला आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या महायुतीच्या पॅनलचे उमेदवार एकामागून एक विजयी होऊ लागलेत. यात १८ पैकी १२ जागा पालकमंत्र्यांना मिळाल्या तर ६ जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली. दरम्यान, यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी तर ना. पाटील यांना खांद्यावर उचलत ठेका धरला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, आमचा विजय झालाय. परंतू आमचे काही चांगले कार्यकर्ते पराभूत झाल्याचे दु:ख आहे.
जाणून घ्या…सर्व विजयी उमेदवारांची नावं आणि मिळालेली मते !
सोसायटी मतदार संघ
चौधरी सुरेश सीताराम (५५५), पवार सुनील दत्तात्रय (५३२), पाटील सुदाम शेनपडू (५१७), पाटील जिजाबराव गिरधर (५१५),पाटील किरण शांताराम (५०६), पाटील रघुनाथ धुडकू (५०७), पाटील रंगराव दोधू (५०३)
महिला राखीव
पाटील लताबाई गजानन (५१९), पाटील रेखाबाई ईश्वर (४९७),
ओबीसी
पाटील रमेश माणिक (६२८),
एनटी संवर्ग
धनगर दिलीपराव उत्तमराव (५७७)
ग्रामपंचायत सर्वसाधारण
चौधरी सुरेखा देविदास (४८५),पाटील रवींद्र भिलाजी (४४१)
एससी संवर्ग
पवार संजय जुलाल (५०३),
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
पाटील प्रेमराज परशुराम (४९०)
व्यापारी मतदार संघ
कर्वा नितीन नंदलाल (१५३),काबरे संजय रमेश (१४४),
हमाल मापाडी मतदार संघ
माळी ज्ञानेश्वर वसंत (१९९)