जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दापोऱ्याहून उमाळाच्या दिशेने जात असताना एका अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे धावून गेलेत. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याला वेळेवर उपचार मिळालेत.
दापोरा रस्त्यावर आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एक शेतकरी माल घेऊन जात असताना गाडी वरून खाली पडला. त्याच वेळेस पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील त्याचं रस्त्यावरून जात होते. ना. पाटील यांनी अपघात झालेल्या शेतकऱ्याला तातडीने गाडी थांबवून मदतीचा हात दिला. यावेळी जि.प.सदस्य पवन सोनवणे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा दिव्य प्रहार लाइव्हचे संपादक मुकेश सोनवणे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसींग पाटील उपस्थित होते.