जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष गौरवसिंह चव्हाण यांनी मागणी केली आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ टक्क्यापेक्षा कमी झाले असल्यामुळे अमळनेर विधानसभा मतदार संघासह खान्देशात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी नुकतीच केली आहे. यासाठी आ. पाटील यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देऊन १) बळीराज्यास हेक्टरी २५,००० रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात यावे. २) शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करण्यात यावे. ३) गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात यावे, अशा मागण्या केल्या. याच पद्धतीने जळगाव ग्रामीणसह खान्देशात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव सिंह चव्हाण यांनी मागणी केली आहे.