जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या महामुलाखतीतून शिंदे गट, बंडखोर आमदार आणि भाजपवर टीका करत आहे. तर दुसरीकडे, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी फेसबुकवरून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.