जळगाव (प्रतिनिधी) आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्रास देत असल्याचा आरोप केला. चिमणराव पाटील शिवसेनेत कधी आले हे सगळ्यांना माहित आहे. चिमणराव पाटील यांच्यापेक्षा गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी दिली. आपली हुकूमशाही चालावी हीच आमदार चिमणराव पाटलांची वृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी संवाद साधला. यात त्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या भूमीकेवर टिका करीत राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. माझा पक्षही या आघाडीत आहे. पालकमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा चिमणराव पाटील यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे बाजू मांडायला हवी होती. असे जाहीरपणे काही बोलण्यात अर्थ नसतो.
माजी आ. सतिश पाटील पुढे म्हणाले की, चिमणराव पाटील शिवसेनेत कधी आले हे सगळ्यांना माहित आहे. चिमणराव पाटील यांच्यापेक्षा गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत. गुलाबराव पाटील चौथ्यांदा निवडून आले आहे. शिवसेना पक्ष संघटनेसाठी त्यांचे काम मोठे आहे. डॉ. हर्षल माने गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेसाठी सक्रिय आहेत. मतदार संघात जे सध्या सुरू आहे. ते चुकीचे आहे. काहीतरी आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडायचे. बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण शोधायचे, म्हणून तर चिमणराव पाटलांचा हा खटाटोप नाही ना? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थीत केला.
चिमणराव पाटील शिवसेनेतून बाहेर पडले तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महत्व देणार नाही. शेवटी त्यांच्यापुढे भाजप हाच पर्याय त्यांना दिसत असावा. आपली हुकूमशाही चालावी हीच आमदार चिमणराव पाटलांची वृत्ती असल्याचा आरोपही माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांनी केला.