जळगाव (प्रतिनीधी) राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी कडवट शब्दात टीका केली होती. या टीकेनंतर संतप्त झालेल्या गुलाबराव पाटील समर्थकांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला.
राज्यात शिवसेनेतील आमदारांसोबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी असल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. ढुंगणाला पाय लावून पळाला, पाटलाला परत पानटपरी चालवावी लागेल, असे वक्तव्य करत टीका केली आहे. या विरोधात आज पुतळा जाळण्यात आला. तसेच गुलाबराव पाटील यांनी नेता म्हणून सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळून ठेवली आहे. यामुळे गुलाबराव पाटील हे आमचे नेते, असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.