जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची जळगाव लोकसभा मतदार संघाच्या सहसंपर्क प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात सामनातून वृत्त प्रकाशित झालेय.
शिवसेनेने केलेल्या फेरबदल नुसार नगरसेवक विष्णू भंगाळे यांची जळगाव शहर जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या भागातील जिल्हाप्रमुखपदी तर डॉक्टर हर्षल माने यांची एरंडोल,पाचोरा आणि चाळीसगाव या परिसराच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. तर विद्यमान जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी बढती मिळाली आहे. दरम्यान, गुलाबराव वाघ यांना जळगाव लोकसभेची खासदारकीची उमेदवारी देण्याच्या दृष्टीने पक्ष चाचपणी करत असल्याचेही कळते.