नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने आईच्या तब्येतीचे कारण दाखवून भेटीसाठी पॅरोल मिळवला आहे.
हरियाणातील रोहतक तुरुंगात कैद असलेल्या गुरमीतला शुक्रवारी चोख बंदोबस्तात गुरुग्रामला रवाना करण्यात आले. गुरुग्राममध्ये त्याला कुठे ठेवले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोबतच, त्याला किती दिवसांचा पॅरोल मिळाला हे सुद्धा सांगण्यात आले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरमीतने १७ मे रोजी सुनारिया तुरुंग अधीक्षक सुनिल सांगवान यांच्याकडे पॅरोलचा अर्ज केला होता. या घटनेच्या 6 दिवसांपूर्वीच गुरमीतची प्रकृती बिघडल्याने त्याला रोहतक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरीही या दरम्यान तो वारंवार हनीप्रीत आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा आग्रह करत होता. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आले होते.