धरणगाव प्रतिनिधी : गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी धरणगाव येथील Good Shepherd School येथे आयोजित तालुका स्तरीय १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकावले.
गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ, चिकाटी व संघभावनेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे विजेतेपद मिळवले. या यशामागे प्रशिक्षक हितेश पवार सर आणि क्रीडा शिक्षिका दीक्षा पैठणकर मॅडम यांचे मार्गदर्शन व अथक प्रयत्न महत्त्वाचे ठरले.
या विजयामुळे संपूर्ण गुरुकुल परिवारात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
शाळेच्या प्राचार्या वैशाली पवार मॅडम, संस्थेचे संचालक, सर्व शिक्षकांनी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
















