धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कृष्ण-गीता नगर परिसरात काही भुरट्या चोरट्यांनी साधारण २० मोटरसायकलमधील पेट्रोल, मॅकव्हील, इंडिकेटर, फेरींग चोरून नेल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय.
यासंदर्भात असे की, आज सकाळी महेंद्रभाई सैनी आपली गाडी काढायला लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, चोरट्यांनी गाडीचे चाक व पेट्रोल चोरले आहे. त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांशी फोनवर संपर्क केला. यानंतर सर्व कॉलनीवासी एकत्र आल्यावर समजले की, सर्वांच्याच गाडीतील पेट्रोल चोरीला गेले आहे. तसेच काही दुचाकींचे पार्ट्ससुद्धा चोरीला गेलेले आहेत.
याप्रसंगी कॉलनीचे नागरिक बी.एम. सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, जे.एस.पवार, महेंद्र सैनी, गोकुळ महाजन, बाळू अत्तरदे, संजय सुतार, एस.एन.कोळी, ज्ञानेश्वर पवार, अमोल झटकर, संतोष जाधव, मनोहर बंसी, पी.डी.पाटील यांनी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.