जळगाव (प्रतिनिधी) पिकअप मालवाहु गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून अडीचलाख आणण्याची मागणी करत पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
पती समाधान विठ्ठल पाटिल, सासरे- विठ्ठल लोटन पाटील, सासु-सताबाई , जेठ-विकास,नणंद प्रतिभा, कल्पना अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुदत्त हौसींग सोसायटी गिरणा पंपींग रोड येथील माहेर वाशीण सविता समाधान पाटिल(वय-२५) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, त्यांचा विवाह समाधान विठ्ठल पाटील(वय-३२) यांच्या सोबत १६ मे २०१५ रोजी झाला होता. त्यानंतर अडीच महिन्यानंतर आज तगायत पति व सासरची मंडळी कडून त्रास देत आहे. पतीसाठी मालवाहु पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरुन अडीच लाख आणावे म्हणुन विवाहीतेला तगादा लावला होता. मागणी पुर्ण न झाल्याने पतिसह सासरच्या मंडळींनी मानसगी व शारीरीक छळ केल्या प्रकरणी समाधान विठ्ठल पाटिल, सासरे- विठ्ठल लोटन पाटील, सासु-सताबाई , जेठ-विकास,नणंद प्रतिभा, कल्पना आदींच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटिल करत आहेत.