चोपडा (प्रतिनिधी) लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही, तूझी राहणीमान गावठी असल्याचे हिणवून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात पतीसह सासू सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रियंका नितीन पाटील (रा.आसनगाव, जि. ठाणे, ह.मु. घाडवेल ता.चोपडा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ मे २०१६ रोजी लग्न झाल्यानंतर २ महिन्यांनी फिर्यादीचे पती नितिन जगन्नाथ पाटील हे पत्नी प्रियंकाला तू मला आवडत नाही. तुझे राहणीमान गावठी आहे. तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही. तु मला शोबत नाही, असे म्हणुन भांडण करित होते. तसेच सासरे जगन्नाथ नामदेव पाटील, सासु उषा जगन्नाथ पाटील, जेठ विनोद जगन्नाथ पाटील व जेठाणी सोनाली विनोद पाटील हे नेहमी विवाहितेस तुला स्वयंपाक करता येत नाही, असे बोलून नेहमी शिविगाळ करुन त्रास देत होते. तर सासरे यांनी विवाहितेस मुलाला गाडी घ्यायची आहे. तू तुझ्या माहेरहून १० लाख रुपये घेऊन येशील तेव्हाच आम्ही तुला नांदवू नाहीतर, तू फारकत देऊन टाक. जर तू फारकत दिली नाही, तर तुला माहेरी सडवू असे म्हणाले होते. याबाबत विवाहितेने महिला दक्षता समीती जळगाव येथे तक्रारी अर्ज केला होता. परंतू ते तेथे सध्दा आले नाही. त्यामुळे विवाहितेला तक्रार निवारण समीती जळगाव यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार देण्याबाबत समजपत्र दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार पो.ना. भरत नाईक हे करीत आहेत.