फैजपूर (प्रतिनिधी) माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने भालोद येथे व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन स्व.कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमत केंद्रातील आणि राज्यातील आजी माजी मंत्री ऑनलाईन सहभागी झाले आणि याच माध्यमातून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोना सदृश्य परिस्थिती मुळे या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली.व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महराज, भक्ती प्रकाशदास शास्त्रीजी , सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शशिकांत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक शशिकांत गाजरे यांनी केले.सूत्रसंचालन जतीन मेढे यांनी तर आभार भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांनी मानले.
उल्हास पाटील ( माजी खासदार )
ज्यानी राजकारणात सुद्धा कटुता निर्माण केली नाही असे निगर्वी आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊ.भाऊंच्या नावाने येणाऱ्या काळात संस्था तयार करून मोठ काम त्यामाध्यमातून करण्याच आम्ही ठरवलेल आहे असे माजी खासदार उल्हास पाटील यांनी नमूद केले.
एकनाथराव खडसे (माजी महसूल मंत्री )
दुरदृष्टीने काम करणारा नेता म्हणजे हरीभाऊ.यावल रावेर भागातील सिंचनाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला.शेळगांव आणि मेगा रिचार्ज साठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहतील.
गुलाबराव पाटील ( पालकमंत्री )
माणसांन मधे माणसाळलेला साधा माणूस म्हणजे हरीभाऊ.पक्षाची उंची वाढवणारा नेता म्हणजे हरीभाऊ.केळीला फळाचा दर्जा मिळावा म्हणून भाऊंनी सातत्याने पाठपुरावा केला.आपण सर्व मिळूनही भविष्यात याच गोष्टीचा पाठपुरावा केल्यास भाऊंना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल.
गिरीश महाजन (माजी जलसंधारण मंत्री )
हरीभाऊंनी स्वताच्या कष्टाने आणि मेहनतीने पक्षात स्वताचे स्थान निर्माण केले.भाऊंना पाण्याविषयी आणि शेतकऱ्यांन विषयी तळमळ होती.हार जित झाली किवा खासदारकीच तिकीट कापल्या गेल पण ते आज पर्यंत पक्षाच्या विरोधात कधीही बोलले नाही.त्यांच्या जाण्याने पक्षाच खुप मोठ नुकसान झालय.
संजय धोत्रे ( केंद्रीय मानव संसाधन मंत्री )
प्रत्येकाला सन्मानाने वागवणारे आणि सातत्याने विकासाच्या चर्चा करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील.
प्रकाश जावडेकर ( केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री )
भाऊंनी केळी विषयाला वाहून घेतल होत.लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे,मतदारसंघाची जपणूक करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील.शेती, माती, पाणी आणि केळी साठीच त्यांच योगदान पुढच्या पिढीला आवर्जून सांगितले पाहिजे.
राजेंद्र फडके (संयोजक बेटी बचाव )
कार्यकर्ता म्हणून जगलेला, कधीही श्रेयवादात न अडकलेला शुद्ध सात्विक आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊ.
अशोक जैन ( अध्यक्ष जैन इरिगेशन )
शेती आणि शेतकरी, कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन जगणारा नेता म्हणजे हरीभाऊ.आदर्श विचारांचा आणि कर्तुत्वाचा वारसा म्हणजे हरीभाऊ.
नितीन गडकरी ( केंद्रीय बांधकाम मंत्री )
पक्षाशी एकनिष्ठ, कटीबद्ध, पक्षावर श्रद्धा असणारे नम्र , मिलनसार, कार्यकर्त्यांन साठी आदर्श म्हणजेच हरीभाऊ.त्यांचे अचानक जाणे दुर्भाग्यपुर्ण असेच आहे.त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.त्यांचे कार्य, आदर्श विचारधारा आपल्याला कायमच दिशादर्शक ठरतील.
माणसातला देव माणूस म्हणजे हरीभाऊ असे जनार्दन हरीजी महाराज यांनी नमूद केले. शरीराने हरीभाऊ आपल्यात नसले तरी कर्तव्याच्या माध्यमातून ते आपल्यात कायम जिवंत असतील असे भक्तीप्रकाश शास्त्री यांनी नमूद केले. राजकारणाच्या चिखलात राहूनही कमळासारखे स्वच्छ चारित्र्यवान नेते म्हणजे हरीभाऊ.भाऊंच्या वागण्यात आणि बोलण्यात साधेपणा होता,ते कायमच संताचा आदर करत.भाऊ त्यांच्या विचारांनी कायमच आपल्या सोबत असतील आणि आम्ही सर्व संत मंडळी कायमच त्यांच्या परीवारा सोबत आहोत असे सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी नमूद केले.आपण सर्वांनी या कठीण काळात जे प्रेम आणि सहकार्य केले त्याची उतराई होण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात मी नक्कीच करणार आहे असे अमोल जावळे यांनी नमूद केले. या प्रसंगी रावेर यावल तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपाचे आणि इतर पक्षीय सर्व जेष्ठ श्रेष्ठ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.