जळगाव (प्रतिनिधी) जळगाव पोलीस प्रमुख हे स्वतः व त्यांच्या सुविद्य पत्नी या वैद्यकिय क्षेत्रातील उंच शिक्षित डॉक्टर असल्याने तसेच जिल्हा अधिकारी अभिजित राऊत हे प्रशासनाचे उच्च अधिकारी असले तरी ते एक उत्कृष्ट खेळाडू असल्याने ते आम्हा जळगावकरांची काळजी घेताय. त्यामुळे आपले आद्य कर्तव्य आहे की, प्रशासनाला सहकार्य करून व्यायाम, मॉर्निंग वॉक घरीच करावा असे आवाहन शासकीय क्रीडा संघटक व प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त फारूक शेख यांनी केले आहे.
मागील तीन दिवसांपासून वर्तमानपत्र उघडले असता मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दंड, अटक, सुटका, पोलिसांशी वाद, लोकप्रतिनिधी पासून लहान मुलांच्या मातांचा सुद्धा यात समावेश होता.
“हे” करून घरीच अनुभवा मॉर्निंग वॉक पेक्षा जास्तीचे फायदे
वॉर्मिंगअप, जम्पिंग, साईड जुम्पिंग, सेटअप, पुलिग, फ्लोरिंग आक्टिव्हिटी, स्टेपिंग, (घरातील जिने चढ – उतार करणे) सूर्य नमस्कार, करून आपण घामो घाम होणार व शेवटी योगा करून समाप्ती करा, आपले ३० ते ४५ मिनिटे हे अत्यंत महत्वाचे ठरतील.