मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गंभीर आरोपांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज सकाळी १० वाजता मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातच आता मलिकांनी एक सूचक ट्विट केलंय. ‘उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, मिलते है आज सुबह १० बजे’, असं ट्विट करत मलिकांनी फडणवीसांना इशारा दिलाय.
नवाब मलिक यांनी एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात रान पेटवलंय. दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडू म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांवर गंभीर आरोप केले. अगदी मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनीही अगदी काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावले. तसंच उद्या सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचीच पोलखोल करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं. त्यांच्या याच पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मलिकांची सकाळी १० वाजता पत्रकार परिषद
फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी ट्विट करुन ‘तयार हूँ, आ रहाँ हूँ’ असं म्हणत आरोपांना उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं साांगितलं. पुढच्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी केलेले आरोप सॉफ्ट पद्धतीने फेटाळून लावत त्यांचेच अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे उद्या सकाळी १० वाजता उघडे पाडू, असा इशाराच मलिकांनी दिला.