भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कपिलनगर वस्ती जवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास अवजड वाहन व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कपिल नगर वस्तीजवळ हवेच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे ते मुंबईकडून येणारी ट्रॉली व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात मध्यरात्री झाला या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे आहेत. यातील जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.