जळगाव (प्रतिनिधी) हॉकी महाराष्ट्र संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जानेवारी शनिवारी डेक्कन जिमखाना पुणे येथे संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनीश आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सचिव मनोज भोरे यांनी अजंडा चे वाचन करून सभेचे संचलन केले.
विविध ठराव संमत
वार्षिक अहवाल वाचून मंजूर करण्यात आला तर वार्षिक हिशोब व पुढील बजेट तसेच ऑडिटरची नेमणूक यासह हॉकी इंडियाने वेबसाईट तयार करून त्यावर अपडेट राहण्याचे दिलेले आदेशाप्रमाणे वेबसाईट करण्यात आली आहे.
एक राज्य एक संघटना
भारतीय ओलंपिक असोसिएशन च्या मार्गदर्शनाप्रमाणे एक राज्य एक संघटना असणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्याची संलग्नता हॉकी इंडियाने हॉकी महाराष्ट्राला दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हॉकी शी संबंधित असलेले संलग्न जिल्हे यांच्यामार्फत घेतलेल्या स्पर्धा च अधिकृत समजण्यात येतील असे आव्हान सचिव मनोज भोरे यांनी केले. कोणालाही अनधिकृत स्पर्धेत खेळू देऊ नये अन्यतः त्यांच्या नूकसानिस हॉकी महाराष्ट्र जवाबदार राहणार नाही. जिल्हा संघटनेच्या अडचणी बाबत आवाज उठविले
हॉकी जळगाव चे सचिव तथा हॉकी महाराष्ट्र चे कार्यकारी संचालक फारूक शेख यांनी जिल्हा संघटनेची संलग्नता फि दहा हजार रुपये न ठेवता पाच हजार रुपये करण्यात यावी, जिल्हा क्रीडा संकुल क्रीडांगणावर टरफ ग्राउंड तयार करण्यासाठी शासनाला निवेदन देण्यात यावे, ज्युनियर व सब ज्युनिअर या स्पर्धा मातीच्या ग्राउंड वर घेण्यात याव्यात व त्याचे आयोजन जिल्हा संघटनांना देण्यात यावे, पंच परीक्षा व पंच यांची कार्यशाळा ही चार पाच जिल्हे मिळून जिल्हा पातळीवर घेण्यात यावी, ऑफिशियलचे प्रशिक्षण व कार्यशाळा सुद्धा जिल्हा पातळीवर घेण्यात यावे. अशी मागणी केली असता त्यास उपस्थित सर्व जिल्ह्यांनी अनुमोदन दिल्याने यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सचिव मनोज भोरे यांनी दिले.
ज्युनियर भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग
नुकत्याच भारताची जुनियर महिला संघ सिली येथे गेला असता त्या ठिकाणी ३ सामने झाले ते तिघेही सामने आपल्या भारतीय ज्युनियर महिला संघाने जिंकले. तसेच या संघात महाराष्ट्राच्या व त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण गावातील तीन मुलींचा समावेश असल्याने त्या तिघींना या वार्षिक सभेत सन्मानित करण्यात आले. यात अक्षता ढेकळे, ऋतुजा पिसाळ, व वैष्णवी फडके यांचा समावेश होता.
जळगावला येण्याचे निमंत्रण दिले
या तिघी भारतीय संघातील ज्युनिअर गटातील मुलींचा हॉकी जळगाव तर्फे सन्मान करण्यात आला. व जळगावी येण्या बाबतचे निमंत्रण पत्र हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख यांनी त्यांना दिले असता त्यांनी ते स्वीकारून लवकरच जळगावात येण्याचे कबूल केले. तसेच जळगावातील ज्युनियर गटातील मुलं आणि मुलींना त्यांच्यामुळे चालना मिळू शकेल.