जळगाव (प्रतिनिधी) ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून १५ मार्च हा दिवस साजरा करणेत येतो. या अनुषंगाने यावर्षी देखील राज्य शासनाकडुन दि. १५ मार्च, २०२१ रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करणेबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत.
शासनाच्या निर्देशनानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारद्वारे दि. १५ मार्च, २०२१ रोजी सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास वेबिनारद्वारे तालुका तहसिल कार्यालयांनी ऑनलाईन उपस्थित रहावे. तसेच सदर कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख यांनीही ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वेय कळविले आहे.