धरणगाव (प्रतिनिधी) दारूविक्रीच्या व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकासह होमगार्डला आज एसीबीने रंगेहात पकडले.
याबाबत वृत्त असे की, तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करणेकामी व तक्रारदार यांच्या दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (वय-३७ रा. संत मिराबाई पिंप्राळा शिवार) याने अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम किरण सपकाळे याचे सांगण्यावरून होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (वय-२५ रा. सोनवद, ता. धरणगाव) यांच्या मदतीने धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पंचासमक्ष अडीच हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे.
पोलीस उपअधिक्षक सतीष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव,पो.नि. लोधी, सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली आहे.