TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव !

पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाला गौरव

vijay waghmare by vijay waghmare
August 15, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रामपंचायती व शासकीय विभागांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पोलीस सेवा, जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, महिला बचतगट, शासकीय अधिकारी- कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे आणि रोख पारितोषिक देण्यात आले.

READ ALSO

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

कार्यक्रमात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जलतारा योजना, अमृत आहार योजना, ISO मानांकन, स्वच्छता अभियान, वेद उपक्रम, सौर गाव योजना यांसारख्या उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. महिला बचतगटांनी आर्थिक सबलीकरण, स्वयंरोजगार आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल पारितोषिके मिळवली. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा, नागरिकांशी प्रभावी संवाद, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि निवडणूक प्रक्रियेत योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा, कायदा-सुव्यवस्था राखण्यात विशेष योगदान, अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणि गुन्हे उकल केल्याबद्दल सन्मानपत्रे देण्यात आली. तसेच सामाजिक क्षेत्रात अवयवदान, तंबाखूमुक्ती अभियान, वृक्षसंवर्धन, तसेच शिक्षण क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बालिका पंचायत ही नावीन्यपूर्ण योजना बालिका पंचायत ही जळगाव जिल्ह्यात एक नावीन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली असून त्या संदर्भातील एक सुंदर माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. या कामाची सुरुवात झालेल्या ग्रामपंचायतीचा गौरव यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पुरस्कार विजेते, मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्यात त्यांनी सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांची, योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपूर्वा वाणी आणि सरीता खाचणे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

अमळनेरातून तरुणीला फूस लावून पळवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पं. स. च्या गृहनिर्माण अभियंत्याला १० हजारांची लाच घेतांना पकडले !

December 4, 2025

आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

May 28, 2023

धरणगावात संविधान चौकाची मागणी मुख्य रस्त्याला करण्याची संविधान समितीची मागणी

September 2, 2025

झोपेत हाताच्या करंगळीला सर्पदंश ; बालिकेचा मृत्यू !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group