मेष : प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे नकोत. काहींना विनाकारण एखादी चिंता सतावणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वादविवादात सहभाग टाळावा. आज चंद्रबल लाभल्याने कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. अकारण एखादा मनस्ताप संभवतो.
वृषभ : घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकी साठी दिवस उत्तम राहील. अकारण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये. मन शांत ठेवावे. आपली विनाकारण चिडचिड होणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. काहींना अनपेक्षितपणे कोणतातरी दंड भरावा लागेल.
कर्क : मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींचे नवीन परिचय होतील. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. नवे स्नेहसंबंध जुळतील. विविध लाभ होतील.
सिंह : नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
कन्या : भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमची जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.
तुळ : आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील. व्यावसायिकांना आजचा दिवस विशेष लाभाचा ठरेल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
वृश्चिक : मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव पडणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. वैचारिक प्रगती होईल.
धनु : प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. मानसिक अस्वस्थता असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात रस वाटणार नाही. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. मनोबल कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर : व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल चांगले असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहेत.आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये . आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमच्या कामाची गती विशेष असणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
मीन : आपला आत्म विशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. तुमची अपेक्षित प्रगती तुम्ही साध्य करणार आहात. काहींना गुरुकृपा लाभेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट देणार आहात. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्तीपासून आर्थिक लाभ होतील. प्रवास सुखकर होतील.