मेष : पैसे खर्च करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी शत्रू तयार होतील. आज तुम्ही आराम करणार आहात. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाईल. वादविवाद टाळावेत. खर्च वाढणार आहेत. आज तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील.
वृषभ : कौटुंबिक व्यवसायात वडिलांचा सल्ला आवश्यक आहे. फालतू खर्च आणि निष्काळजीपणा टाळावा लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आज तुमच्या नोकरीच्या संबंधित प्रश्न मिटतील. रखडलेली कामे मार्गी लावणार आहात. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील.
मिथुन : तुमच्या जीवनसाथीच्या गरजा आज पूर्ण कराल. त्यांच्यासोबत खरेदीला जाल. लव्ह लाईफ मजबूत होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे नकोशी होतील. कामाचा कंटाळा कराल. अनियंत्रित खर्च टाळावा लागेल. प्रवास आज नकोत. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील.
कर्क : आज तुमच्या घरात शुभ कार्यक्रम होऊ शकतात. शिक्षकांच्या मदतीने आज विद्यार्थी ध्येय साध्य करतील. मुला-मुलींकरिता वेळ देणार आहात. काहींना अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. भविष्यात आर्थिक स्थिती सुधारेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. नवीन कार्ये हाती घेतल्यास त्यात सुद्धा अडचणी येतील.
सिंह : नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. विरोधक तुमच्या विरुद्ध नवीन कट रचू शकतात. आज तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाचा असेल. घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख – शांती अनुभवाल.
कन्या : ज्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रलबिंत कामे वरिष्ठांच्या सल्ल्याने पूर्ण होतील. नातेवाइकांना भेटण्यास जाल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. आज तुम्हाला व्यवसायासाठी काही नवीन योजना बनवाव्या लागतील. प्रवासास अनुकूलता आहे. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल.
तुळ : मुलाच्या लग्नाशी संबंधित समस्या संपतील. जोडीदाराशी काही मुद्द्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपण कौटुंबिक प्रियजनांसमवेत व्यतित करणार आहात. मनोबल उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. आज प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. मनोबल उत्तम असणार आहे. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील.
वृश्चिक : आळस सोडला तर भविष्यात फायदा होईल. कोर्टात सुरु असलेले प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सल्ल्याने संपेल. आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज अधिक काम करावे लागेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. धनलाभ होईल. दूर राहणार्या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील.
धनु : व्यावसायिकांना पैशांची कमतरता भासू शकते. प्रेम जीवनात नवीनता येईल. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक कराल. नको त्या गोष्टीवर तुमचा वेळ खर्च होईल. तुमची चिडचिड होणार आहे. कामे रखडतील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. वडिलांच्या सल्ल्याने कुटुंबातील अडचणी संपतील. काहींना एखादी चिंता लागून राहील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान – सन्मान मिळतील.
मकर : वरिष्ठाचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. नवीन काम हाती घेण्यासाठी ही वेळ योग्य नाही. आज तुम्ही प्रियजनांकरिता वेळ देणार आहात. मनोबल उत्तम राहील. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आज भविष्य सुधारण्यासाठी काही नवीन योजना आखल्या जातील. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहे. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल.
कुंभ : नीट लक्ष दिल्यास सर्व अडचणीतून सुटका होईल. आज वडिलांची तब्येत बिघडू शकते. कुटुंबात काही मतभेद निर्माण होऊ शकतात. उत्साही राहाल. अनेक कामात यश मिळवणार आहात. आनंदी व आशावादी राहाल. मानसिक सौख्य व समाधान लाभणार आहे. काहींना मान-सन्मान लाभेल.आज कामाच्या ठिकाणी अडथळे येतील. प्रवासात अनुकूलता लाभेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील.
मीन : एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होईल. व्यवसायानिमित्त आज प्रवास केल्यास फायदा. घरासाठी तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी कराल. मनोबल वाढेल. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. रखडलेल्या कामात सुयश मिळवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज एखादी आनंददायी घटना घडेल. अनपेक्षित प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.