मेष : आज तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहकार्य मिळेल. तुम्हाला काही रक्कम खर्च करावी लागेल. मनोबल उत्तम असणार आहे. आज तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणारे मांडणार आहात. आत्मविश्वासपूर्वक कामे पूर्ण करणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. मुलांच्या लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
वृषभ : तुम्हाला आज मोठे यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक उद्विग्नता संपेल. उत्साही राहाल. आशावादीपणाने कार्यरत राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आज तुम्हाला कामासाठी बाहेर जावे लागेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. कामाचा ताण कमी होईल.
मिथुन : तणावामुळे तुमची निर्णय क्षमता कमकुवत होईल. ज्यामुळे काम अडकू शकते. मनोबल कमी असणार आहे. प्रवास शक्यतो आज नकोत. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज तुम्हाला एखादी चिंता लागून राहण्याची शक्यता आहे.आज कायदेशीर वादात तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो. वाहने जपून चालवावीत.
कर्क : डोळ्यांशी संबंधित काही समस्या येतील. बोलण्यामुळे कामात अधिक लोक आकर्षित होतील. आज तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामाचा ताण कमी करू शकणार आहात. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्साहाने कार्यरत राहाल.
सिंह : व्यवसायत काही नवीन बदल कराल. ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. आज नोकरीच्या नवीन संधी मिळतील. आज एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. शांत राहावे. काहींना अनावश्यक कामे करावी लागणार आहेत व त्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील. मित्रांकडून आर्थिक लाभ होतील. प्रवास आज नकोत. अकारण वेळ वाया जाईल.
कन्या : ज तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. आज तुम्ही तुमच्या मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. मानसिक प्रसन्नता राहील. काहीजण आज एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. व्यवसायात धावपळ करावी लागेल. प्रवास केल्याने तुम्हाला फायदा होईल. तुमचे बौद्धिक परिवर्तन होणार आहे.
तुळ : तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. अडचणींचा सामना करावा लागेल. धोकादायक काम करणे टाळा. आज तुम्ही अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. गोड बोलण्याने इतरांच्या मनावर विजय मिळवाल. काम चांगल्याने यश मिळेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे.
वृश्चिक : मुलांवरचे प्रम वाढेल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. नोकरीत पद आणि अधिकार वाढेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. कामाचा ताण कमी होईल. प्रवासात काळजी घ्यावी. आज सासरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर नीट विचार करा. नातेसंबंधात दूरावा येईल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
धनु : बुद्धीने तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात भरभराटी होईल. अडकलेले पैसे तुम्हाला आज मिळतील. उत्साही राहणार आहात. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सुसंवाद राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. आरोग्याशी काही समस्या उद्भवतील. ज्यामुळे तुमचे मन अशांत असेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : पार्टनरशीप केलेल्या व्यवसायत भरपूर नफा मिळेल. जीवनसाथीकडून तुम्हाला आनंद मिळेल. आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असल्याने दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. काही खर्चांना सामोरे जावे लागेल. कौटुंबिक वाद आज संपतील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील. घाईने घेतलेले निर्णय तुम्हाला नुकसान होईल. आज आपणाला विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. तुमचे मनोबल कमी राहणार आहे. दैनंदिन गरजांवर थोडे पैसे खर्च कराल. नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने भविष्यात फायदा होईल. काहींना नैराश्य जाणवेल.
मीन : आरोग्याच्या बाबतीत काही समस्या जाणावतील. पचन आणि पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवतील. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. मित्र-मैत्रिणी व सहकारी यांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. कौटुंबिक व्यवसायासाठी वडिलांचा सल्ला घ्या. जोडीदार प्रत्येक अडचणीत साथ देईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.