मेष : आज आपली अनावश्यक चिडचिड होणार आहे. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. नोकरदारांनी आधी काही योजना बनवाव्यात आणि मगच नियोजन सुरू करावं. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल.
वृषभ :आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक उद्विग्नता कमी होईल. व्यावसायिक विविध क्षेत्रांतून नफा कमावण्यात यशस्वी होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवासात व वाहने चालविताना आनंद लाभणार आहे. कामाच्या समस्याही वाढू शकतात. काम व्यवस्थित होण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
मिथुन : तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाणार आहे. अतिरिक्त कामे करावी लागतील. मानसिक उद्विग्नतेमुळे दैनंदिन कामात तुमचे लक्ष लागणार नाही. जर व्यावसायिक नवीन काम करण्याचा विचार करत असतील तर त्यांना थोडा वेळ थांबावं लागेल. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. काम करताना संयम ठेवणे अधिक गरजेचे आहे. कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काम हळूवारपणे करावे लागेल.
कर्क : तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात फायदा होईल. काहींना विविध लाभ होतील. तुमचे आरोग्य व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. कामाचा उरक राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमचा प्रभाव वाढेल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. स्वत:ला आनंदी ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कामात सावध राहावे लागेल.
सिंह : आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कामाची इतरांवर विशेष छाप पडेल. आज ऑफिसच्या कामात काळजी घ्या. तुमच्या कामात कोणतीही चूक करू नका. तुम्ही आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची सुवर्ण संधी मिळेल.
कन्या : छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू नका, अन्यथा तुमच्या कुटुंबात अडचणी येऊ शकतात. तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतही काम करा, सर्व कामं एकट्याने करू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. आज तुमच्या कुटुंबात खूप आनंद असेल. प्रवास सुखकर होतील. आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
तुळ : आज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं, दैनंदिन दिनचर्येत नियमितता आणावी. आर्थिक कामात तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला अपेक्षित सहकार्य लाभेल. आजचा दिवस चांगला जाईल. आनंदी व आशावादी असणार आहात. रागामुळे कामात अडथळे येतील. स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. खर्च वाढू शकतात. पैशांची कमतरता भासू शकते.
वृश्चिक : कोणत्याही प्रकारची गुपितं ठेवू नका, अन्यथा तुमच्या भागीदारीत दुरावा निर्माण होऊ शकतो. मनोबल वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमच्या कामात तुम्ही बारकाईने लक्ष देणार आहात. आज तुमच्या ऑफिसमध्ये थोडं सावध राहा. उत्साहाने व विशेष उमेदीने कार्यरत राहाणार आहात. दैनंदिन कामे होतील. नोकरी करणारे लोक कामात खूप व्यस्त असतील. कामाचे कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल.
धनु : आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. दैनंदिन कामे रखडणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास चांगलं होईल, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं. काहींना एखादी चिंता सतावेल तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मालमत्तेशी संबंधित मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. कोर्टात तुम्हाला स्वत:च्या हक्कासाठी लढावे लागेल.
मकर : व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आर्थिक लाभ होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे, मात्र तरीही तुम्ही उत्साहाने कार्यरत असणार आहात. आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. प्रवास सुखकर होतील. अभ्यासात यश मिळेल. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ : व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. सार्वजनिक कामात तुम्ही उत्साहाने सहभागी होणार आहात. कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम असणार आहे. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोरंजनावर पैसे खर्च कराल. विवाहासाठी पात्र असणाऱ्या लोकांना आज चांगला प्रस्ताव येईल. नवीन वाहन किंवा वस्तू खरेदी करु शकता.
मीन : व्यापारी वर्गाने कोणत्याही महिला ग्राहकाशी गैरवर्तन करू नये. मनोबल उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. प्रवासात आनंद मिळेल. आज व्यवसायात निष्काळजी राहू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि रोमांचक असेल. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असू शकते. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल.