मेष : परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अभ्यासकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे एखाद्याबाबतीत वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अडचणीत सापडाल. अनपेक्षितपणे प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. अनोळखी व्यक्ति मदत करतील. मेहनतीला पर्याय नाही.
वृषभ : कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी अन्यथा, नुकसान टाळता येईल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात आपला उत्साही सहभाग राहील. गुंतवणूक केल्याने भविष्यात मोठा फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना मानसन्मान लाभेल. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात.
मिथुन : तरच परीक्षेत यशस्वी व्हाल. व्यवसायात काही नवीन तंत्रांचा अवलंब कराल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आज तुम्ही आपल्या हातातील सर्व कामे पूर्ण करणार आहात. आज महत्त्वाची माहिती मिळेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या.
कर्क : महत्त्वाचे काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कुटुंबातील विरोधकांपासून सावध राहा. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. व्यवसायात नवीन योजना आखल्याने चांगला नफा मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका.
सिंह : नातेवाईकांसी मतभेद सोडवण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. मित्रांना भेटल्याने तुम्हाला फायदा होईल. मनोबल वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला काल जाणवत असणारी अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबात वाद निर्माण होईल. बोलण्यात गोडवा ठेवा. रखडलेली व अपूर्ण कामे आज तुम्ही पूर्ण करणार आहात. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कन्या : मनापासून केलेले काम आज तुमच्यासाठी चांगले राहिल. आज तुमचे मनोबल कमी असणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. आजचा दिवस व्यवसायात प्रामाणिकपणे काम करण्याचा असेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. भडक मार्गाचा अवलंब करू नका. मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे.
तुळ : नोकरीमध्ये टीम वर्क करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुमचे सहकारी कर्मचारी खुश होतील. मनोबल उत्तम असणार आहे. काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. प्रेमजीवनात बहर येईल. तुम्ही आपल्या प्रियजनांकरिता वेळ देऊ शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामामध्ये आज तुमची प्रसंशा होईल. कामातील चिंता कमी होईल. उत्साही व आनंदी रहाल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. जुने गैरसमज दूर होतील. अवाजवी खर्च टाळावा. दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल.
धनु : सहकार्यांशी वाद घालू नका, अन्यथा अडचणीत सापडाल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आज तुमचे मनोबल वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याने व्यवसायात फायदा होईल. प्रवासास अनुकूलता राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने तुम्ही प्रयत्नरत रहाल. उपासनेत मन रमवावे. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते.
मकर : कामाची परिस्थिती चांगली राहिल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनावश्यक कामे करावी लागत असल्याने आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना नैराश्य जाणवेल. कोणतेही काम करण्याआधी विचार करा. कुटुंबात मतभेद होतील. उदासीनता राहील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत.
कुंभ : खास मित्रासाठी भेटवस्तू खरेदी कराल. पैसे जपून खर्च करा. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. काल जाणवत असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. सहकारी कर्मचाऱ्यांसोबत कामाच्या ठिकाणी शत्रू प्रबळ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील.
मीन : कुटुंबातील सदस्य आनंदी राहातील. आज अनावश्यक खर्च वाढेल. आज तुमची मानसिकता काहीशी नकारात्मक राहील. अनावश्यक वेळ वाया जाईल. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवणार आहेत. रखडलेली कामे आज पूर्ण होतील. मुलांच्या भविष्याबद्देल चिंतेत राहाल. प्रवास शक्यतो टाळावेत- वाहने जपून चालवावित. आरोग्यात सुधारणा होईल. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो.