मेष : कोणाशी तरी मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. संभाषणादरम्यान नकारात्मक शब्द वापरणे टाळा. विद्यार्थी आणि तरुणांना अडचणीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्यांशी मतभेदाची शक्यता.
वृषभ : महिलांना त्यांची घरगुती आणि वैयक्तिक कामे सहजतेने पूर्ण करता येतील. घरातील ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीची थोडी चिंता राहील. आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन : कोणतीही दीर्घकाळची चिंता किंवा तणाव देखील दूर होईल. कौटुंबिक सदस्यांसोबत मनोरंजनाच्या कामात वेळ जाईल. फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी॰ एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.
कर्क : अचानक खर्च होऊ शकतो जो टाळता करता येणार नाही आणि जवळच्या व्यक्तीशी आर्थिक बाबींबाबत वाद होण्याची शक्यता आहे. दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.
सिंह : महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी थोडा वेळ काढा. साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.
कन्या : तुमच्या कोणत्याही कमकुवपणावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत राहा आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या करिअर आणि अभ्यासाशी संबंधित गोष्टींमध्ये अपेक्षित परिणाम मिळतील. दुसर्यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.
तूळ : व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. काहीवेळा कुटुंबातील सदस्याच्या कार्यामुळे मन उदास होऊ शकते. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.
वृश्चिक : आज घेतलेला कोणताही निर्णय नजीकच्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जुने वाद मिटवल्याने मनःशांती मिळेल. घाई आणि निष्काळजीपणासारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा.उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.
धनू : तुम्ही चांगल्यासाठी सकारात्मक बदल करण्याचा विचार कराल. यात तुम्हाला यशही मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला शांती मिळेल. आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.
मकर : काही काळ कुटुंबात चाललेली अशांतता दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम करा. वित्त किंवा गुंतवणुकीशी संबंधित काम अतिशय काळजीपूर्वक करा, त्यात चूक होऊ शकते. जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.
कुंभ : आजचे ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. भावंडांसोबत थोडा वेळ घालवल्याने नाते घट्ट होईल. दुपारनंतर काही अप्रिय बातम्यांमुळे मन निराश होईल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.
मीन : वडीलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वादही तुमचे मनोबल वाढवेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी, आपल्या बजेटची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.