मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल. आजारपणावर खर्च होईल. नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. स्थिर उपजीविका साधन लाभेल.
कन्या : व्यवसायात वाढ होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक समतोल राखाल.
तुळ : धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. अभ्यास व सहकार्याच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.
धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.व्यवसायाचे निर्णय मार्गी लागतील. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्याने प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी मिळतील. शत्रू पीडा कमी होईल.
मकर : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिकता व दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवावे लागतील. द्विधा मनस्थितीत निर्णय घेऊ नका.
कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. नियोजित कामांत अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो. वास्तूविषयक कामामध्ये अडचणी येतील.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील. कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल. धनप्राप्तीचे योग. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. लाभदायक दिवस. भाऊबंदकीचा त्रास कमी होईल.