TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवाजवी बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवावा !

महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून घ्यावे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून खाजगी रुग्णालये देखील फूल झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात असून या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून एक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोरोना संदर्भातील विविध विषयांबाबत शुक्रवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जळगावात अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बिलाची आकारणी न करता लाखोंची बिल काढले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. रुग्णालयांच्या मनमानीमुळे गोरगरीब रुग्णांचे कंबरडे मोडले जात असून त्यांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांची एकत्रित समिती गठित करण्यात येऊन रुग्णालयांची तपासणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच जर कुणाकडून अधिकचे बील आकारणी केले असल्यास त्याची बिले आमच्याकडे सादर केल्यास आकारणी केलेली अतिरिक्त रक्कम देखील परत मिळवून देऊ असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

स्वयंसेवी संस्थांना रेमेडीसीवर उपलब्ध करून द्या

जळगाव शहर जिल्हा औषधी अधिकारी यांनी रेमेडीसीवर इंजेक्शन कोविड रूग्णालयांमध्ये उपलब्ध होईल असे सांगितले आहे परंतु तरीही नागरिकांची इंजेक्शनसाठी फिरफिर होत आहे. नागरिकांचा त्रास वाचावा यासाठी एखादी समिती नेमून त्यामाध्यमातून इंजेक्शन वितरित करण्यात यावे. तसेच जळगावात काही सामाजिक संस्था अल्पदराने रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देत आहे अशा संस्थांना रेमेडीसीवर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देत विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी देखील महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे.

गृह विलगीकरणाबाबत फेरविचार करावा जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्णाला गृह विलगीकरणाची परवानगी देताना त्या अर्जावर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरांची स्वाक्षरी आवश्यक असते. डॉक्टरने उपचार करताना रुग्णाची दररोज घरी जाऊन काळजी घेणे आणि उपचार करणे गरजेचे असते परंतु सध्या शहरात असे काही होत असल्याचे दिसून येत नाही. नागरिकांचे हित आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गृहविलगीकरणाची परवानगी देण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

खडीने भरलेला ट्रक रेल्वेवर धडकला ; सुदैवाने जीवित हानी टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव हनी ट्रॅप प्रकरण : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटच्या दृष्टीने पोलीस तपासाची गरज !

October 21, 2020

जळगावात पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

August 31, 2023

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

January 12, 2021

गिरीशभाऊंची बदनामीसाठी भूसंपादनात भ्रष्टाचाराचे खोटे वृत्त प्रसारित ; जामनेरच्या शेतकऱ्यांचे निवेदन !

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group