मुंबई वृत्तसंस्था एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे. तर अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयातही रोजची होणारी गर्दी सुद्धा वाढली आहे. या सर्व प्रकारात अब्दुल सत्तार याचा संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
अब्दुल सत्तार यांना फारीस कादरी नावाच्या एका तरुणाने फोन करून आधी कसे आहात विचारले. त्यानंतर आता कुठे आहात?, असे विचारल्यावर सत्तार यांनी गोव्यात असल्याचे सांगितले. पुढे या तरुणाने चांगली जोरात पार्टी सुरु आहे. वाटते, भाजपकडून किती पैसे घेतले?, असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी या तरुणाला थेट शिवीगाळ करायला सुरवात केली. हीच ऑडिओ क्लिप सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांना महसूल राज्यमंत्री पदाची जवाबदारी मिळाली. तर तसेच त्यांना आता राज्यमंत्रीपदाच्या जागीनकॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते, असेही बोलले जात आहे. बहुमत चाचणी झाल्यावर अब्दुल सत्तार मतदारसंघात परतणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. परंतु फोनवरून शिवीगाळ केल्यामुळे सोशल मीडियात अब्दुल सत्तार यांच्या विषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
















