मुंबई (वृत्तसंस्था) सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं असून मलिकांनी ईडी छाप्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नवाब मलिक म्हणाले, “मी ऐकलंय की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. घाबरणं म्हणजे दररोजचं मरणं आहे. आम्हाला घाबरायचं नाही, तर लढायचं आहे. गांधी गोऱ्यांसोबत लढले, आम्ही चोरांसोबत लढू.” आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये मलिकांनी कोर्टाच्या अवमानप्रकरणी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर भाष्य केलंय. त्यांनी लाईव्ह लॉ या कायदेविषय संकेतस्थळाचं ट्वीट रिट्विट केलं. यात नवाब मलिक यांनी न्यायालयात काय म्हटलं हे सांगण्यात आलं. यानुसार, नवाब मलिक म्हणाले, “मला वाटतं माझं वक्तव्य मला केंद्रीय संस्थाचा राजकीय उद्देशाने होत असलेल्या वापरावर आणि आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडताना अधिकाऱ्यांच्या वर्तनावर भाष्य करण्यापासून रोखत नाही.”