मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे आपल्याला चांगले ओळखत असून आपण त्यांना जेव्हा गरज लागली तेव्हा पैशांची मदत केली, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
“साहिल जावेदपैकी जावेद यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सुरु करतात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावं घेतात. पण माझा सारख्या तरुणाला तर उत्तर देवू शकत नाही. हे रोज बोलतात. भाजपवर आरोप करतात. हे माझे घर आहे, जिथे ते सप्टेंबर महिन्यात आले होते. ते म्हणतात, मला ओळखत नाही. हे दर वर्षी गणपतीत माझ्याकडे येतात. त्यांना पैशांची जेव्हा मदत लागली तेव्हा मी केली आहे”, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केली.
“मी आपल्याला माझ्या घराचा फोटो दाखवला आहे. माझ्या २०१७ च्या घरचा फोटो आहे. तुम्ही ओळखत नसतील तर अनोळखी माणसाच्या घरी येऊन बसणार? मी मोबाईल रेकॉर्ड पाठवले आहेत. मी त्यांना आर्थिक मदत केलीय. तुम्ही त्यांना विचाराना. मी तुम्हाला त्याबाबत सर्व डिटेल देईन. मी चेकची डिटेल देईन. मी आतापर्यंत ज्या गोष्टी म्हटल्या, मग त्या नवाब मलिकांबाबत असतील किंवा संजय राऊत यांच्या बद्दल असतील. मी थुंकून चाटत नाही. मी जे बोललो त्याचं उत्तर आणि पुरावेही दिले. खोटे आरोप करणं हे माझ्या रक्तात नाही. संजय राऊतांच्या रक्तात ते असेल”, असं मोहित कंबोज यावेळी म्हणाले.
“मी जर फडणवीस साहेबांचा ब्लू आय बॅाय असेल तर माझे हे मी नशीब समजेन. पण तुम्ही सांगा की तुम्ही नेमके कोणाचे ब्लू आय बॅाय आहात, पवारांचे की ठाकरेंचे?”, असा खोचक सवाल यावेळी कंबोज यांनी केला. “गुरु आशिष यांनी पत्रा कंपाऊंडमध्ये घोटाळा केला. त्याविरोधात माझी तक्रार आहे. माझ्या सारख्या ९ बिल्डरांनी एफएसआय विकत घेतला. पण तो आम्हाला मिळालाच नाही. तुमच्याकडे जी ईओडब्लूकडे तक्रार आहे त्यात तक्रारदार कोण हे तरी पहा. मी तुम्हाला खुले आव्हान देतो की तुम्ही सर्व चौकशी कसा मी उत्तर द्यायला तयार आहे. डीडीपीए इन्फ्रा कंपनीने १७५ एकर जमीन विकली. अँटी करप्शनने केणतीच चौकशी केली नाही”, असं मोहित कंबोज म्हणाले.