चोपडा (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या राज्यात सुरु आहे. या सर्वात आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आव्हानच दिलंय. नारायण राणे यांनी हिंमत असेल तर जळगावमध्ये येऊन जाहीर सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विष्णापूर येथे आश्रम शाळेच्या इमारतींच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री ना. पाटील म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा अशा कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसलेल्या उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. बिना लायसन्सचे असल्यावर सुद्धा उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये ते नंबर एकवर आहेत. हे आम्ही सांगत नसून सर्वे सांगत आहे. तीन पायाच्या गाडीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ड्रायव्हर, मध्ये क्लिनर आणि मागे कंडक्टर असे तीन जण बसले आहेत. शरद पवार कंट्रोलर असतांना बिना लायसेन्स ड्रायव्हर असूनही सरकार उत्तम हाताळत आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळातही ठाकरे हे न घाबरता उत्कृष्ठ सरकार चालवत आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले.
















