मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना दिला. यावरून काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.
यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्यावरून राज्यपालांना टोला लगावला आहे. पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,’तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय? राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. ते पुढे म्हणाले, ‘पवारांचा सल्ला घेतला नाही तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असं म्हणत, राज्यपालांनाही पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. त्यामुळं मी पवारांनी विनंती करेन त्यांनाही सल्ला द्यावा.’