नांदुरा (प्रफुल्ल बिचारे) तालुक्यातील मौजे माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज 15 डिसेंबर 2022 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजेश रामराव काळे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी निवेदन देणाऱ्यांना माहिती अथवा कुठल्याही प्रकारचे शिक्षक फिरकले सुद्धा नाहीत. जिल्हा परिषद शाळेमध्ये एक ते चार वर्ग असून शिक्षक संख्या तीन आहे व दोन वर्ग एकाच वर्गामध्ये बसवण्यात येतात व त्या कारणास्तव मुलांना काही कळेनासे होत आहे. त्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भविष्यामध्ये वेळ येऊ शकते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आपण लवकरात लवकर एक शिक्षक नियुक्त करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच नांदुरा तालुक्यातील बहुसंख्य जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी असून आपण लवकरात लवकर या शाळेवर शिक्षक संख्या कमी असेल तेथे शिक्षक रुजू करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता, अशी माहिती एका पत्राद्वारे राजेश रामराव काळे यांनी माहिती दिली होती.
आज 21 डिसेंबर रोजी त्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरवात करण्यात आली. नांदूरा पंचायत समिती येथील अधिकारी यांचे उत्तर ऐकून कळाले की, त्यांनी वरिष्ठ जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठपुरवठा केला आहे. तरिही विरिष्ठ तसेच शिक्षण मंत्री यांच्या कडून कोणताच प्रतिसाद मिळत नाहीय. यावर मनसेचे तालुका उपअध्यक्ष राजेश काळे, प्रसिध्धी प्रमुख योगेश सपकाळ यांनी इशारा दिला आहे की, जर या मुद्द्याची दखल घेण्यात आली नाही. आणि विद्यार्थ्यांचे नुसकान भरपाई झाली नाही तर मनसेतर्फे स्वखर्चातून शिक्षक नेमण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येइल. जर प्रशासन अपयशी ठरत असेल तर असे लेखी देण्यात येइल. अन्यथा शिक्षण मंत्री यांना विदर्भात मनसे फिरु देनार नाही. यावेळी मनसे नांदूरा तालुका उपअध्यक्ष राजेश काळे, प्रसिद्धी प्रमुख योगेश सपकाळ, शहर उपअध्यक्ष निकेतन वाघमारे, झुंजार महाराष्ट्र सैनिक गणेश जाधव , विभाग अध्यक्ष धनंजय देशमुख , जेष्ठ सामजिक कार्यकर्ते राजेश निखाडे उपस्थीथ होते. गटशिक्षण अधिकारी यांच्या सोबत संवाद साधुन यशस्वीरित्या आंदोलन पार पडले. पुढील कार्यवाई मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे व मनसे वरिष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनात करण्यात येण्यात आहे.