धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त धरणगाव शाखेतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत करीअर गाईडंसचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर मार्गदर्शनासाठी नोबेल फाउंडेशन चे अध्यक्ष जयदीप पाटील, अभाविप जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, शहराध्यक्ष शाम भाटिया, शहर मंत्री आर्यंन सैंदाणे उपस्थित होते.
१०/१२ वी नंतरच्या करिअर संधी व पालकांची भूमिका या संदर्भात करिअर गाईडन्स तसेच दहावी व बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे ? सायन्स आर्ट्स कॉमर्स मधील करिअर ? विषयाची निवड कशी करावी ? मुलांचे करियर घडविताना पालकांची भूमिका ? स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरु करावी ? अशा विविध विषयांचे मार्गदर्शन जयदीप पाटील यांनी केले. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७४ वर्षांचा इतिहास प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी मांडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वेदांत भट, विवेक महाले, कुणाल कासार, यश चौधरी, निकिता महाजन, सागर महाजन, प्रथमेश कासार, कृष्णा बडगुजर, गौतम महाजन, गणेश भाटीया, आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनुश्री भावे हीने केले, तर आभार शहर मंत्री आर्यंन सैंदाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् घेऊन कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.